अनेक स्तलांतरित कुटुंबाना जगण्यासाठी वीटभट्टीवर काम करावे लागते त्यांच्या मुलानाही या कामात जबरदस्ती ओढले जाते त्याचा मोबदलाही त्यांना मिळत नाही.
भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करू नका हे सांगण्यासाठी अवनिचे कार्यकर्ते नेहमी समुपदेशन करत असतात
किशोरवयीन मुलांसोबत ग्रामीण, शहरी शाळा व वस्ती पातळीवर अवनि संस्थेने लिंगभाव समानता हा उपक्रम सुरु केला आहे.
कचरा वेचक कुटुंबातील मुलांना खासगी क्लासेस लावणे परवडत नाही यासाठी वस्तीपातळीवरील मुलांसाठी संस्थेने अभ्यासिका सुरु केल्या आहेत. या अभ्यासिकेसाठी शिक्षक नेमले आहेत.